Header Ads

ad728
  • Breaking News

    गर्भवती महिलांसाठी सामूहिक योग शिबिर

    चांगसा- चीनमधील हुनान प्रांतात गर्भवती महिलांसाठी सामूहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 505 गर्भवतींनी योगाचे धडे गिरवले. गर्भवती महिलांचा योगा शिबिरातील सहभागाचा हा विश्वविक्रम ठरला. सुरक्षित व नैसर्गिक प्रसूतीसाठी मार्गदर्शन करणे हा या योग शिबिराचा उद्देश होता.

    चीनच्या रुग्णालयांमध्ये योगा वेगाने लोकप्रिय होत आहे. याआधी गत वर्षी ग्वांगडाँग प्रांतात सेनझेनमध्ये अशाच प्रकारचे शिबिर झाले होते. त्याचा विक्रम (423) या वेळी मोडीत निघाला.

    विश्वविक्रम प्रस्थापित
    2013 मध्ये चीनमध्येच झालेला विक्रम मोडीत
    37 मिनिटे 28 सेकंदांपर्यंत योगा. 

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Top Ad

    ad728

    Post Bottom Ad

    ad728