Header Ads

ad728
  • Breaking News

    एका इंजेक्शनद्वारे टाळता येणार हृदयविकार!???

    भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचे बहुमूल्य संशोधनवॉशिंग्टन : केवळ एका इंजेक्शनच्या साहाय्याने तुमच्या रक्तातील कोलेस्टेरोलचे प्रमाण कायमचे कमी करणारे अनोखे तंत्रज्ञान भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने विकसित केले आहे. या इंजेक्शनच्या वापरामुळे हृदयविकाराचा धोका ४0 ते ९0 टक्क्यांनी कमी होणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. किरण मुसुनुरू असे या शास्त्रज्ञाचे नाव असून, या इंजेक्शनचा उंदरांवरील प्रयोग यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

    अमेरिकेच्या पेनसिल्वानिया विद्यापीठातील हॉर्वर्ड स्टेम सेल इन्स्टिट्यूटमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून काम पाहणारे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ किरण मुसुनुरू यांच्या नेतृत्वाखाली हृदयविकारावर संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांच्या एका चमूने या प्राणघातक आजारावर रामबाण उपाय शोधून काढला आहे. रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कायमचे कमी करणारे एक नवे तंत्रज्ञान या शास्त्रज्ञांनी शोधले आहे. या तंत्रज्ञानामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित करणार्‍या यकृतातील 'पीसीएसके९' या जनुकाच्या कार्यपद्धतीत बदल केला जाणार आहे. टेक्सासमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासादरम्यान ३ टक्के लोकांमधील 'पीसीएसके९' या जनुकात विरोधी बदल घडताना आढळून आला. हा विरोधी बदल या लोकांसाठी चांगला ठरला असून, यामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका ४७ ते ८८ टक्के कमी झाल्याचे निदर्शनास आले. नेमक्या याच बदलावर लक्ष केंद्रित करून मुसुनुरू व त्यांच्या सहकार्‍यांनी सामान्य 'पीसीएसके९'मध्ये बदल करण्यासाठी जनुक संपादन तंत्रज्ञानाचा अवलंब केला. या तंत्रज्ञानाला 'क्रीस्पर/कॅस९' असे म्हणतात. जनुक संपादनामुळे जनुकांमध्ये कायमस्वरूपी बदल करणे शक्य असल्याचे मुसुनुरू यांनी सांगितले. जनुकांमध्ये बदल करण्यासाठी उंदरांच्या यकृतावर करण्यात आलेल्या प्रयोगांदरम्यान हे तंत्रज्ञान यशस्वी ठरल्याचे आढळून आले आहे. या प्रयोगादरम्यान उंदराच्या यकृतातील सुधारित 'पीसीएसके९' जनुकांनी स्वत:ची नक्कल करीत अनेक नुकसानग्रस्त पेशींची यकृताबाहेर हकालपट्टी केल्याचे दिसून आले. तसेच यामुळे चार दिवसांनंतर उंदरांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ३५ ते ४0 टक्क्यांनी कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उंदरांप्रमाणेच माणसाच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ४0 टक्क्यांनी कमी झाले, तर हृदयविकाराचा धोका ९0 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, असे मुसुनुरू यांनी सांगितले. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या नियतकालिकात याविषयीचे संशोधन छापून आले आहे.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Post Top Ad

    ad728

    Post Bottom Ad

    ad728